Cine Marathi

Home News Bio About Contact

एका दिवसात 40 सिगरेट्स पिऊन अमृता खानविलकरचा घसा बसला !

  धर्मा प्रोडक्शन्सच्या 100 कोटी क्लबमध्ये पोहोचलेल्या ‘राजी’ चित्रपटात महत्वाची भूमिका बजावल्यावर आता अभिनेत्री अमृता खानविलकर ‘हंगामा प्ले’च्या ‘डॅमेज’ ह्या वेबसीरीजच्या माध्यमातून डिजीटल दूनियेत पाऊल ठेवतेय. राजीमध्ये मुनिरा ह्या एका पाकिस्तानी गृहिणीच्या साध्या सोज्वळ रूपात दिसलेली अमृता आता डॅमेज ह्या वेबसीरिजमधून बोल्ड, ब्युटिफुल आणि सेन्शुअस लविनाच्या रूपात दिसणार आहे.

  सूत्रांनुसार, ह्या बिंधास्त, बेपरवाह लविनाच्या भूमिकेला न्याय देताना अमृताला सिगरेट प्यायची होती. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सिगरेटला कधीही हात न लावणारी अमृता भूमिकेची गरज म्हणून सिगरेट ओढायला तयार तर झाली. पण तिला ते काही जमत नव्हतं.

  डॅमेज वेबसीरिजच्या युनिटकडून कळतं की, सिगरेट पकडण्यापासून ते एखाद्या व्यसनीमाणसाप्रमाणे सिगरेट ओढण्यासाठीचा सराव अमृताला चांगलाच महागात पडला. तिने ह्या शुटिंगच्या दरम्यान एके दिवशी 40 सिगरेट ओढल्या. आणि त्यामूळे नंतर तब्बल दोन आठवडे तिच्या तोंडातून आवाज निघणेच कठीण झाले होते.

  अमृता ह्याविषयी सांगते, “मला सिगरेटच्या वासानेही मळमळतं. माझ्या आसपास कोणी सिगरेट ओढत असेल तर मी लगेच त्या व्यक्तिला रागावते. अशावेळी मनोरूग्ण लविनाची भूमिका रंगवताना मलाच सिगरेट ओढणं भाग होतं. सिगरेट पिणं भूमिकेचा अविभाज्य हिस्सा असल्याने मी तयार झाले खरी, पण मला सिगरेट ओढणं जमेच ना.”

  अमृता पूढे सांगते, “शुटिंगदरम्यान दिग्दर्शक सारखा ओरडत होता, इनहेल कर.. पण काही ते इनहेल करून सिगरेटचा धूर व्यवस्थित सोडणं मला जमत नव्हतं. दिवसअखेरीला ते जमलं खरं. पण ह्या फंदात एका दिवसात मी 40 सिगरेट प्यायल्या. आणि माझा दूस-या दिवसापासून घसाच बसला. जवळ जवळ दोन आठवडे मला बोलता येत नव्हतं.”Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Amruta Khanvilkar, New Web Series , Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.