हेमांगी कवी म्हणतेय “नुसतं सोशल मीडियावर बोलू नका.. हा बलात्कारा एवढाच गुन्हा आहे.”

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

दिल्लीतील निर्भया प्रकारानंतर उत्तर प्रदेशात आणखी एका बलात्काराची जोरदार चर्चा चालू आहे ती म्हणजे हाथरस मधील. हाथरस मध्ये मनीषा वाल्मिकी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आणि या घटनेचे पडसाद देशभर उमटले. सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी या घटनेबाबत मत मांडली. याचा दरम्यान पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या प्रियांका गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून मराठी अभिनेत्री हेमांगी कवी भडकली आहे.

प्रियांका गांधींचा हाथरसमधील फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. प्रियांका गांधींचा फोटो शेअर करत तिने “हा बलात्काराएवढाच मोठा गुन्हा असल्याचं” म्हटलं आहे.

या फोटोमध्ये एक पोलीस अधिकारी प्रियांका गांधी यांचा हात पकडताना दिसत आहे. त्यावर हेमांगी कवी व्यक्त झाली आहे. फेसबुकवर पोस्ट करत हेमांगी म्हणाली, “नुसतं सोशल मीडियावर येऊन बोलू नका मॅडम. बाहेर पडा म्हणणाऱ्यांनो, चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा. आहे का सुरक्षित? कसे वाटत आहेत ते हात तिच्यावर? हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा आहे. मूळ समस्या कुठे आहे कळतं आहे का?”, असा सवाल हेमांगीने या पोस्टमधून केला.

“आता यात ही, हा कुणाचा फोटो? प्रियंका गांधी की जियंका गांधी, कुठल्या पक्षाची, आताच कशी बाहेर आली? यात गुंतवून मूळ समस्या बाजूला ठेवूया. काय?”, अशी उपरोधिक टीकाही हेमांगीने केली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची शनिवारी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. हाथरस प्रकरणातील पीडितेच्या आईने प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपलं दु:ख व्यक्त केलं. यावेळी त्या ढसाढसा रडल्या.

हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारवर यावरून सर्वस्तरातून टीका होत असताना आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *