सुखी माणसाचा सदरा! राज ठाकरेंचा भरत जाधवसाठी खास मेसेज

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

लोकडाऊन मध्ये नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता लवकरच कलर्स मराठीवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ ह्या मालिकेची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या मालिकेचं दिग्दर्शन केदार शिंदे करणार असून अभिनेते भरत जाधव या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कलाक्षेत्राशी खुप जुनं नातं आहे. त्यांनी नेहमीच मराठी कलाकारांना प्रोत्साहान दिले. या मालिकेसाठी राज ठाकरे यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नव्या मालिकेविषयी कौतुकास्पद पोस्ट लिहून अभिनेता भरत जाधव यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणतात कि,

“कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं”, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे. तसेच

“भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना या अनिश्चिततेतून ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल…”, असंही ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित आणि भरत जाधव यांच्या मुख्य भूमिकेत असणारी ‘सुखी माणसाचा सदरा’ हि मालिका कलर्स मराठी या चॅनेलवर २५ ॲाक्टोबर पासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *