का झाले सुयश टिळक-अक्षया देवधरच्या ब्रेकअप

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे मराठी मालिकाविश्वातील चर्चेतलं जोडपं. दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर कबुली कधीच दिली नसली, तरी सोशल मीडियावरुन त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगायच्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात सारे काही बिनसलं असल्याचे  बोलले जात आहे. इन्स्टाग्राममुळे ज्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती, त्या सुयश-अक्षयाचे ब्रेकअप झाल्याचे अंदाज इन्स्टाग्राममुळेच बांधले जात आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख. राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी गाजत असतानाच तिच्या ऑफस्क्रीन अफेअरची चर्चाही रंगू लागली. अंजलीबाईंचा रियल लाईफमधला राणादा म्हणजेच अभिनेता  “सुयश टिळक”

अक्षया आणि सुयश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर झळकू लागल्यावर. कधी त्या फोटोंना ‘मिस यू’ कॅप्शन असायचं, तर कधी हार्ट शेप इमोजी, कधी अक्षयाच्या बोटातील अंगठी चाहत्यांचं लक्ष वेधून घेऊ लागली. दोघांचा साखरपुडा झाल्यावर चाहत्यांनीच शिक्कामोर्तब केलं. मात्र याला अक्षया किंवा सुयशपैकी कोणीही कधीच दुजोरा दिला नव्हता.

सुयशची ‘का रे दुरावा’ हि मालिका  संपली, त्यानंतर बापमाणूस, सख्या रे सारख्या मालिका, चित्रपट, म्युझिक व्हिडीओ, वेब सीरीज अशी त्याची मुशाफिरी होऊ लागली, अक्षया मात्र जवळपास चार वर्षांपासून ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्ये गुंतून आहे.

एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या अक्षया-सुयशच्या नात्यात अचानक असं काय  घडलं ? याची   उत्सुक्ता चाहत्यांना लागून राहिली आहे.  इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची बातमी समोर आली आहे आणि त्यांच्यात काहीतरी  बिनसल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत .

सुयश आता ‘खाली पिली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता इशान खट्टर, अभिनेत्री अनन्या पांडे यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तर ‘मंग्या’ नावाचे पात्र सुयश साकारणार आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून सुयश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *