सुयश टिळक दिसणार या नवीन बॉंलिवूड चित्रपटात. वाचा संपूर्ण बातमी.

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

झी मराठीवर आतापर्यंत बऱ्याच मालिका गाजल्या. बऱ्याच मालिकांनी कमी काळात प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. त्याचबरोबर  झी मराठीवरील गाजलेली मालिका “का रे दुरावा” मध्ये जय या अत्यंत साध्या सोज्वळ मुलाची भुमिका साकारलेला सुयश टिळक  आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमात चक्क एका गुंंडाच्या रुपात दिसुन येणार आहे, ईशान खट्टर  आणि अनन्या पांंडे यांंचे मुख्य पात्र असलेल्या “खाली पिली”  या सिनेमातुन सुयश बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला जात आहे.

अलिकडेच त्याने आपल्या इंंस्टाग्राम अकाउंट वरुन आपले काही चित्रिकरणाच्या वेळचे फोटो शेअर केले होते, जे पाहुन तरी सुयशला हा राऊडी लूक सुट होतोय असे म्हणता येईल. एका वृत्तपत्राला  दिलेल्या मुलाखतीत सुद्धा सुयशने या चित्रपटाविषयी तसेच आपल्या भुमिकेविषयी माहिती देत आपण मन्या नावाच्या गुंंडाची भुमिका साकारत असल्याचे सांंगितले होते. तसेच पहिला सिनेमा आहे मात्र लॉकडाउन मुळे त्याचे प्रदर्शन मोठ्या पडद्यावर होणार नाही याची खंंतही त्याने बोलुन दाखवली.

सुयशने सांंगितल्यानुसार तो कुठल्या तरी मालिकेत काम करत असताना चित्रपटाच्या टीम मधील एकाने त्याला पाहिले होते, लूक आवडल्याने त्यांनी सुयशला ऑडिशनसाठी बोलावलं. तीन ऑडिशन्स आणि लूक टेस्ट दिल्यानंतर त्याच्या वाट्याला ही भुमिका आली, यात सर्वात मोठा टास्क होता भाषेचा. पहिलाच चित्रपट असल्याने हिंंदीचा लहेजा शिकुन सांंभाळण्यासाठी मेहनत घ्यावी लागली असेही सुयश म्हणतो. भविष्यात मालिका, सिनेमांंसोबतच वेबसीरीज मध्येही आपले नशीब आजमवण्याचा सुयशचा विचार आहे.

खाली पिली सिनेमात ईशान खट्टर आणि अनन्या एकत्र दिसुन येणार आहेत या दोघांंचेही सुयश ने भरपुर कौतुक केलेय. ईशानचे तर अभिनयावर प्रचंड प्रेम आहे शिवाय अनन्या अत्यंंत सिंंपल आहे तिचा कुठलाही टॅंट्रम नसायचा असे सुयश सांंगतो.

दरम्यान सुयश सध्या मराठी सिनेसृष्टीत सुद्धा चर्चेत आहे, आज पासुन त्याची नवी मालिका शुभमंंगल ऑनलाईन प्रेक्षकांंच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. यात तो सायली संजीव सोबत पहिल्यांंदाच काम करताना पाहायला मिळणार आहे, सुबोध भावे या मालिकेचा निर्माता आहे. सुयश टिळकच्या या चित्रपटाची उत्सुकता त्याचा चाहत्यांना नक्कीच लागून राहिली असेल. 

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *