विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेने मानले स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक यांचे आभार… वाचा संपूर्ण बातमी

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

सर्वांचा लाडका विनोदी कलाकार कुशल बद्रिके याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता.
या व्हिडीओमार्फत कुशल बद्रिकेने ठाण्यातील एका गंभीर समस्येला फेसबुक लाईव्हद्वारे वाचा फोडली होती.

या व्हिडीओच्या माध्यमातून कुशलने ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करत काहीतरी करा अशा शब्दात ठाणेकरांची कैफियत मांडली होती . हा व्हिडीओ रात्री उशिरा कुशल बद्रिकेने लाईव्ह करून शेअर केला होता.
या लाईव्हमध्ये कुशल बद्रिके म्हणतो की, मी ठाण्यात सूरज वॉटरपार्क समोर राहतो, त्याठिकाणी वाघबीळजवळ जो ब्रीज रस्त्यापासून वेगळा होतो त्याठिकाणी कोणतीही स्ट्रीट लाईट नाही, याठिकाणी रोज अपघात होतात.
वारंवार अपघात घडतात, रिक्षा पलटतात. आताही येथे अपघात झाला आहे असं सांगत त्याने डंपर दुभाजकाला धडकला असल्याचं दृश्य दाखवलं. त्यामुळे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याकडे लक्ष द्याव ही विनंती आहे. काहीतरी करा, लोक त्रासात आहेत. प्रचंड नुकसान होत आहे असं त्याने सांगितले होते.

तसेच हा माझा कोणताही स्टंट नाही, कोणाकडेही माझे बोट दाखवत नाही. मी खूप दिवसांपासून विचार करत होतो. नेहमी याठिकाणी काही ना काही घडत असतं. हा व्हिडीओ त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचावा, लाईट लावा किंवा रेडियम लावा जेणेकरुन वाहन चालकांना ज्याठिकाणी ब्रीज सुरु होतो ते कळेल…त्यामुळे अनेकांचे जीव वाचवू शकतो असंही कुशल बद्रिकेने म्हटलं होतं.

यानंतर कुशल बद्रिकेने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. कुशल बद्रिकेने मांडलेल्या समस्येवर स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक यांनी दखल घेतल्यामुळे कुशलने प्रतापजी सरनाईक यांचे आभार मानले आहे.

खुप खुप आभार 🙏🏻

Posted by Kushal Badrike on Friday, September 11, 2020

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *