सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलाचे 35 व्या वर्षी निधन.

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

२०२० या वर्षात बॉलिवूडमधून अनेक वाईट बातम्या समोर आल्या. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान आणि सुशांत सिंह राजपूतसहीत अनेक कलाकारांचं निधन झालं.  यातच प्रसिद्ध बॉलिवूड आणि भजन गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचं वयाच्या केवळ ३५ व्या निधन झाल्याची दु:खद बातमी शनिवारी सकाळी समोर आली आहे. अनुराधा पौडवाल यांना एक मुलगी कविता पौडवाल आणि मुलगा आदित्य पौडवाल अशी दोन मुलं आहेत.

आदित्यची किडनी फेल झाल्याने त्याचं निधन झाल्याचे वुत्तातून सांगण्यात आले आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.

आदित्यलाही आपली आई अनुरादा यांच्यासारखाच संगीतत क्षेत्रात रस होता. वयाच्या ६ व्या वर्षापासूनच आदित्य उस्ताद अल्ला रखा  यांच्याकडे तबला वादनाचे धडे घ्यायचा. आदित्यने त्याचं म्युझिकमधील डिप्लोमा न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केला होता. तसेच त्यानेसुध्दा अनेक भजनं गायली आहेत. याशिवाय सर्वात कमी वयाचा संगीत दिग्दर्शक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉ्र्डमध्येसुध्दा आदित्यचं नाव नोंदवलं गेलं होतं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *