पुष्कर जोगचे हे रूप पाहून चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का.

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

लॉकडाऊन च्या काळात काही कलाकारांनी घर बसल्या यूट्यूब चॕनलचा नवा मार्ग निवडला. बऱ्याच कलाकार मंडळीनी स्वतःचं मेकअप चॅनल, कुकिंग चॅनल सुरु केलं आहे.
यातच अभिनेता पुष्कर जोगने लॉकडाऊन च्या काळात त्याचं डान्स युट्युब चॅनेल सुरू केलं. पुष्करला आधीपासूनच डान्सची फार आवड आहे. या चॕनल मार्फत तो स्वतःचे नवीनवीन डान्स व्हिडिओ यूट्यूब वर शेअर करत असतो.

मात्र आता सोशल मिडियावर पुष्कर जोग ( Pushkar Jog ) च्या एका व्हिडिओची चर्चा सुरू आहे. या व्हिडीओला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.पुष्करने काही दिवसांपूर्वी एका डान्सचा टिजर सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये नऊवारी साडी नेसून ठसकेबाज लावणी करताना एक स्त्री पाहायला मिळाली मात्र हा डान्स करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? हे गुलदस्त्यातच होतं.

तर आज या डान्सचा पूर्ण व्हिडिओ पुष्करने शेअर केला आहे. या व्हिडीओत दुसरं कोणी नसून खुद्द पुष्कर जोग आहे. चक्क स्री वेशात, लावणीच्या वेशभुषेत “तुमच्या गिरणीचा वाजुदे भोंगा” या गाण्यावर पुष्करने ठसकेबाज लावणी सादर केली आहे. पुष्करचं हे रूप प्रेक्षकांनी पसंत केलं आहे.
त्याच्या या बहारदार लावणीला त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *