टॉम एन्ड जेरी या कार्टुनच्या व्हिडीओला या मराठी मालिकेचं गाणं लावून व्हिडिओ केला वायरल.

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेचं शिर्षक गीत प्रचंड पसंत केलं गेलं. या मालिकेच्या शीर्षकला सामान्य जनतेपासून ते मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनी देखील तितकंच पसंत केलं. हे गाणं एवढं लोकप्रिय झालं होतं की चक्क अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या गाण्यावर व्हिडीओ बनवला होता.

आता हे गाणं पुन्हा चर्चेत आलं आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. मात्र नुकतच या गाण्याचा एक हटके मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. टॉम एन्ड जेरी या कार्टुनच्या व्हिडीओला हे गाणं लावून एक भन्नाट व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.आणि हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला आहे.

विराजसने हा व्हिडीओ पाहताच त्याला हे प्रचंड आवडलं असल्याचं त्याने सोशल मिडीयावर सांगीतलं आहे. विराजसने हा व्हिडीओ शेयर केला आहे. तो लिहीतो की, “ज्यांनी कुणी कष्ट घेऊन हे बनवलं आहे, ती माझी आवडती व्यक्ती.” अशाप्रकारे पोस्ट करून विराजसने हा व्हिडीओ बनवणाऱ्याचे आभार मानले आहेत.

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *