आशाताईंच्या वाढदिवसाचं घरच्याघरीच जोरदार सेलिब्रेशन.. .

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

आपल्या सुरेल स्वरांनी तुम्हा आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लाडक्या आशाताई म्हणजेच सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज ८७ वा वाढदिवस आहे.
भारतीय संगीत क्षेत्राततलं आशाताईंचं योगदान अतुलनीय आहे. कुटुंबियांसोबत त्यांनी आपला वाढदिवस नुकताच साजरा केला. यावेळी त्यांच्या चेह-यावरचं हसू आणि तेज कायम होतं.

आशाताई ह्या सध्या मुलगा आनंद आणि सून अनुजा यांच्यासोबत सध्या लोणावळ्यात आहेत. त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांची नातवंड झनई आणि रंझई यांनी त्यांचा आवडता फ्रेश क्रिम फ्रुट केक मुंबईहून मागवला.आणि सर्वांनी आशाताईंच्या वाढदिवसाचं घरच्याघरीच जोरदार सेलिब्रेशन केलं.

आशाताईंच्या दोन्ही नातवंडांच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसला. झनईने खास लॉकडाऊन असूनही मुंबईतून आशाताईंसाठी त्यांचे आवडते पदार्थ आणले. दोन्ही नातवंडं आशाताईंवर भरभरुन प्रेम करतात, त्यांचीसुध्दा ती प्रचंड लाडकी आहेत. आशा भोसले यांनी त्यांचा सोशल मीडियावर त्यांचा वादिवसाच्या सरप्राईझचा व्हिडिओ शेअर केला आहे.

87-88 या वर्षादरम्यान मला आणखी बरंच काही करायचं आहे. टॅलेंट शो #AshaKiAsha साठी आलेल्या 3000 स्पर्धकांमधून योग्य टॅलेण्ट निवडणं हा खरतंर खुप मोठा टास्क आहे, असं त्यां सांगतात . संपूर्ण जगभरातून या स्पर्धेसाठी स्पर्धक भाग घेतायत. आजच्या तरुणाईमध्ये खरंच खुप टॅलेण्ट आहे आणि त्यातून एकाची निवड करणं फार कठीण आहे, असं आशाताई आवर्जून सांगतात.

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *