अद्वैत दादरकरने दरवाज्यावर लावून घेतली हि प्रिंट

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

प्रत्येक कलाकाराची पहिली पायरी हि रंगभूमीच असते. रंगभूमीच्या सहवासात राहणं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असत. कलाकार मंडळी करियरमध्ये कितीही यशस्वी झाले तरी त्यांना रंगभूमीची आठवण येतेच. अभिनेता अद्वैत दादरकरचंही असंच काहीसं झालं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रंगभूमीपासून प्रेक्षक आणि कलाकार दोघंही लांब आहेत. आणि अद्वैत दादरकरलाही नाटकाची आठवण येते आहे. नाटकाच्या जाहिरातीमध्ये असलेल्या नावांप्रमाणे त्याने दरवाज्यावर प्रिंट करून घेतली आहेत. नुकताच त्याने त्याचा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

यावेळी असलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘ही २ नावं पेपर मधे नाटकाच्या जाहिरातीत दिसायची..( लेखक- दिग्दर्शक) पण सध्या दरवाज्यावर आहेत.. ब्लॅक अँड व्हाईट कलर वापरून न्यूज पेपर चा फील देण्याचा प्रयत्न..आणि व्यावसायिक नाटकाच्या जाहिरातीत लं टिपिकल हसू चेहऱ्यावर..नवीन नाटक करायला पाहिजे.’ त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर अद्वैत नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा करायला हरकत नाही.

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *