हा मराठी अभिनेता घेतोय जिल्हा रुग्णालयात उपचार…

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

कोरोनाचे रुग्ण आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सामान्य जनतेपासून ते कलारमंडळींना देखील कोरोनाशी झुंज द्यावी लागतेय. काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिजीत केळकरने त्याचा इंस्टग्राम वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगितले होते. तर आता अभिजीत केळकर यांचावर ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिजित केळकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षण जाणवत नव्हती पण त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर अभिजित यांना इतर रुग्णांमध्ये न ठेवता, त्यांना प्रिफॅब्रीकेटेड पोर्टल कंटेनर मध्ये ठेवण्यात आले आहे. कलाकार मंडळी देखील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाणे पसंत करत आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. तसेच याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला विचासरले असता, आता अभिजीत केळकर यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अशाच नवनवीन न्युज साठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *