पुन्हा एकदा आजीच्या भूमिकेत दिसणार रोहिणी हट्टंगडी!!!

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा...

झी युवा’ वाहिनी, तरुणाईला आवडतील अशा उत्तमोत्तम मालिका आणि कार्यक्रम  प्रेक्षकांसाठी घेऊन येते. विविध दर्जेदार मालिका, कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा ‘झी युवा’ वर  पाहायला मिळतात. फुलपाखरू, फ्रेशर्स, लव लग्न लोचा, बन मस्का या  मलिकांपासून ते सध्या सुरू असलेल्या साजणा, प्रेम पॉयजन पंगा अशा निरनिराळ्या मालिका, ‘युवा सिंगर एक नंबर’, ‘युवा डान्सिंग क्वीन’ या स्पर्धा, मेहफिलसारखा संगीतावर आधारित कार्यक्रम, असे नानाविध कार्यक्रम या वाहिनीवर प्रेक्षकांनी आजपर्यंत  पाहिले आणि प्रेक्षकांना ते आवडलेही. 

आता ‘झी युवा’वर लवकरच आणखीएक उत्कृष्ट मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेचे नावदेखील अत्यंत निराळे आहे. डॉक्टर  डॉन  !

होणार सून मी या घरची’मधील आई आजी असो, किंवा ‘चार दिवस सासूचे’ मालिकेतीलसासू; रोहिणी हट्टंगडी या नावाची जादू नेहमी निराळीच असते. सगळ्यांची लाडकी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे.  जान्हवीची आजेसासू, ‘झी युवा’ वाहिनीवर एका खट्याळ  आजीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कडक आणि शिस्तप्रिय सासू म्हणून आणि प्रेमळ आजी म्हणून याआधी अनेकदा रोहिणी हट्टंगडी यांना प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. या अष्टपैलू अभिनेत्रीला आता  एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘डॉक्टर डॉन’ मालिकेतील या आजीचा लुक कसा असेल, याविषयी सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे.

‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या निमित्ताने एक मॉडर्न आजी रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा निराळी आणि  मजेशीर अशी ही भूमिका असेल. त्यांना एका अफलातून लुकमध्ये पाहण्याची संधी सुद्धा त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. उत्कृष्ट अभिनय आणि विशेष लुकचं सरप्राईज अशी दुहेरी धमाल सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे.

अशाच नवनवीन न्युज सर्वात आधी पाहण्यासाठी Follow करा सिने मराठी च्या इंस्टाग्राम अकाउंट ला @cinemarathiofficial

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *