Cine Marathi

Home News Celebs About Contact

झी युवावर १८ डिसेंबर पासून येतोय प्रत्येकाच्या मनातला ' बापमाणूस '....

  दिग्दर्शक संजय जाधव यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आणि त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो ठेवणीतला फोटो आहे असं अजिबात वाटत नाही. रजनीकांत आणि संजय जाधव ह्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीचा हा फोटो आहे, असं एकंदर दिसून येतंय. ह्या फोटो सोबत लिहिलेलं कॅपशन नक्कीच उत्सुकता वाढवणारं आहे ज्यात "Happy Birthday @superstarrajini. Sir.. aap jiyo hazaaro saal. I m lucky I could meet you in person in this life." असं लिहले आहे.

  जगभरातले चाहते सुपरस्टार रजनीकांत यांना शुभेच्छा देतात आणि ह्या चाहत्यांमध्ये अनेक कलाकारांचा समावेश असतो हे विशेष सांगण्याची गरज नाही. त्यामुळे अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात हे नक्कीच, परंतु दिग्दर्शक संजय जाधव ह्यांनी रजनीकांथ सोबतचा हा रेसेन्ट फोटो पोस्ट करून सोबत एका नव्या चर्चेला सुरुवात केली आहे.

 सध्या येरे येरे पैसा ह्या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेले संजय जाधव आपला पुढचा चित्रपट सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत करणार का? संजय जाधव यांच्यामुळे रजनीकांत चक्क मराठी सिनेमात दिसणार का? अशा अनेक चर्चाना सुरुवात झाली आहे.


You May Also Like