Cine Marathi

Home News Celebs About Contact

* जुई गडकरी *

  जुई ट्रेंड हिंदुस्थानी क्लासिक सिंगर आहे. याशिवाय तिने कथ्थकचे दोन वर्षे रितसर प्रशिक्षण घेतले आहे.जुईने एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहायक दिग्दर्शिका म्हणून कामाला सुरुवात केली होती. आईच्या आग्रहाखातर तिने स्वतःचे पोर्टफोलिया करुन घेतले. दिवंगत फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी तिचे पोर्टफोलियो केले होते.

  'पुढचं पाऊल' या मालिकेद्वारे जुई घराघरांत पोहोचली. कल्याणी या भूमिकेने तिला बरीच लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेपूर्वी जुई तीन मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बाजीराव मस्तानी' मालिकेत चंदा, 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेत सोनिया आणि 'तुझवीण सख्या रे' मालिकेत लावण्याच्या भूमिकेतून जुई प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

  जुईला पाळीव प्राण्यांचे वेड आहे. सेटवर तिच्याकडे छोट्या मांजरी आहेत.दोन वर्षांपूर्वी 8 जुलैला घरी बर्थडे सेलिब्रेशन सुरू सुरू असताना एक मुलगा जुईच्या काकांना दोन पत्रे देऊन पळून गेला. जुईला जीवे मारण्याची धमकी या निनावी पत्राद्वारे देण्यात आली होती. पत्र मिळताच जुईचे काका आणि वडील केतन गडकरी यांनी कर्जत पोलिसात रीतसर तक्रार दिली होती.

  तिच्या मालिकेच्या सेटवर कोणत्याही अनोखळी व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई करणयात आली होती. सुदैवाने जुई या संकटातून बाहेर पडली आहे.पडद्यावर नेहमी साडीत किंवा सलवारसूटमध्ये दिसणारी जुई खासगी आयुष्यात बरीच ग्लॅमरस आहे. पहा जुईचे काही न पाहिलेले फोटो...

Some Gorgeous photos of Jui


मराठी सेलेब्रेटीज चे कधीही न पाहिलेले लेटेस्ट विडिओ पाहण्यासाठी विझिट करा आमच्या युट्युब चॅनेल सिने मराठी ला.

You May Also Like