Cine Marathi

Home News Upcomming Celebs Bio New Videos

'झी मराठीवर सुरु होतोय सुरांचा दंगा : सारेगमप - घे पंगा, कर दंगा..!

संगीत म्हणजे मराठमोळ्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्राच्या महावाहिनीने अर्थात झी मराठीने, सुरुवातीपासून मराठी माणसाची ही संगीताची आवड आपल्या दर्जेदार कार्यक्रमांमधून जोपासली आहे. मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय कार्यक्रम 'सारेगमप' हे त्याचं उत्तम उदाहरण! 'घे पंगा, कर दंगा' असं म्हणत, १३ नोव्हेंबरपासून दर सोमवार-मंगळवार रात्री ९.३० वाजता, झी मराठी वाहिनी घेऊन येत आहे 'सारेगमप'चं एक नवं कोरं लखलखतं पर्व..!

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील होतकरू गायक-गायिकांच्या गान कलेला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि जगभरातील रसिक श्रोत्यांना स्वरांच्या सरीत चिंब भिजवण्यासाठी 'सारेगमप'चं नवं पर्व सज्ज झालंय. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आणि निर्माते रवी जाधव या पर्वात परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यासोबत स्पर्धकांना मार्गदर्शन मिळेल, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे यांचं आणि महाराष्ट्राचा लाडका लिटिल चॅम्प 'रोहित राऊत' या पर्वात सूत्रसंचालकाच्या वेगळ्या भूमिकेत आपणास पाहायला मिळेल.

मराठी सेलेब्रेटीज चे कधीही न पाहिलेले लेटेस्ट विडिओ पाहण्यासाठी विझिट करा आमच्या युट्युब चॅनेल सिने मराठी ला.

You May Also Like