Cine Marathi

Home News Celebs About Contact

देवाशप्पथ: देव कि मित्र....?

    देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मत आहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे. आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडायच्या झाल्या तर देव आणि माणसाची भेट कशी होईल? या भन्नाट फँटसीवर बेतलेली देवा शप्पथ ही मालिका झी युवावर सोमवार ते शनिवार रोज रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांना पहायला मिळते.

    साधारणतः देव म्हंटल की भक्ती आणि चमत्कार या विषयी दाखवले जाते. पण देवाशप्पथ या मालिकेत या पारंपरिक विचारला छेद देत एक उत्तम कथा पहायला मिळतेय. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वी तलावर आला आहे. पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही. आपण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा न करता काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपात मानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहे, हे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झी युवा वाहिनी करत आहे.

    या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण उर्फ आजचा क्रिश च्या भूमिकेत क्षितिश दाते आहे तर त्याच बरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोक च्या भूमिकेत संकर्षण कऱ्हाडे आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे, शाल्मली टोळ्ये , अभिषेक कुलकर्णी , कौमुदी वालोकर चैत्राली गुप्ते ,आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.


You May Also Like