Cine Marathi

Home News Celebs About Contact

परिसेप्शनला या, विराट-अनुष्काचं मोदींना निमंत्रण

  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा होणार आहे. यासाठी दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं आहे. मोदींनी विराट आणि अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या.

  लग्नाचा कार्यक्रम हा अत्यंत खाजगी पद्धतीने करण्यात आला असला तरी भारतात रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम होणार आहे. 21 तारखेला दिल्लीत, तर 26 तारखेला मुंबईत जंगी रिसेप्शन होणार आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील आणि क्रिकेटमधील दिग्गज हजर असतील.

  या कार्यक्रमानंतर विराट कोहली नव्या वर्षात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पाच जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर अनुष्काही शुटिंगला सुरुवात करणार आहे.


You May Also Like