Cine Marathi

Home News Celebs About Contact

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास पडद्यावर

  हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारीत 'ठाकरे' या चित्रपटाचे टीझर लाँच नुकतेच मुंबई येथे पार पडले. शिवसेना-मनसे हे नेहमी एकमेकांसमोर नव्हे तर एकमेकांसोबत मिळून हा चित्रपट तयार केल्याने सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुक्ता लागली आहे. या टीझर लाँच सोहळ्याला अभिनेता अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. हिंदीत तयार होणाऱ्या या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका कोण करणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. अगदी टीझर लाँचपर्यंत या चित्रपटात अभिनेता म्हणून अजय देवगण भूमिका करणार अशी चर्चा होती. पण समोर आला तो नवाजुद्दीन सिद्दीकी.

  नवाजुद्दीन या कार्यक्रमाला हजर राहू न शकल्याने त्याचा एक व्हिडिओ तेथे दाखवण्यात आला. या चित्रपटाविषयी त्याने भावना व्यक्त केली. ‘मी मराठी कसा बोलेन, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण मला मराठी बोलण्याची प्रेरणा बाळासाहेबच देतील,’ असे नवाजुद्दीनने यावेळी म्हटले. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या शूटिंगमध्ये मॉरीशस येथे असल्याने तो या टीझर लाँच सोहळ्याला येऊ शकला नाही. या खास कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी मराठी अभिनेता सचिन खेडेकर यांनी स्वीकारली होती. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमिताभ बच्चन यावेळी उपस्थित होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे आणि संजय राऊत यांची निर्मिती आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2019 साली रिलीज होणार आहे.

  ‘बाळासाहेबांच्या आयुष्याची बरीच वर्षे जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मोठ्या पडद्यावर मांडले जावेत’, असे राऊत म्हणाले. जनसामान्यांचा नेता म्हणून ओळख असणाऱ्या बाळासाहेबांचा संघर्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा चित्रपट साकारला जातोय.

Tags and Keywords: Balasaheb Thackarey, Thackarey Movie, Hindurhuday Samrat, Marathi Movie, Cine Marathi, Upcomming Movies, Teaser.

You May Also Like