Cine Marathi

Home News Bio About Contact

संजय जाधव ह्यांच्या वाढदिवसाला लाँच झाली त्यांची वेबसाइट....

  सुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव ह्यांचा 18 जुलैला वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी संजय जाधव ह्यांना त्यांच्या मित्र-मंडळी आणि चाहत्यांकडून भरपूर गिफ्ट्स येतात. यंदा मात्र संजय जाधव ह्यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनाच एक आगळं गिफ्ट मिळालंय. संजय जाधव ह्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ही वेबसाइट लाँच झाली आहे.

  संजय जाधव ह्यांच्या टिमने ही वेबसाइट त्यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. ह्याविषयी संजय जाधव ह्यांच्या दुनियादारी, तूहिरे, प्यारवाली लव्हस्टोरी आणि गुरू ह्या सिनेमाचे निर्माते आणि बिजनेस पार्टनर दिपक राणे म्हणतात, “दादांचा (संजय जाधव) वाढदिवस हा आमच्या पूर्ण टिमसाठी खूप मोठा सण असतो. त्यामूळे त्यांच्यासाठी काहीतरी खास आम्ही करू इच्छितो. म्हणूनच यंदा टिमने त्यांना ही वेबसाइट भेट दिली आहे. आम्हांला आशा आहे की, त्यांच्या चाहत्यांनाही ही वेबसाइट खूप आवडेल.”

  संजय जाधव म्हणतात, “ही वेबसाइट हे माझ्यासाठी सरप्राइज होतं. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी उठल्यावर हा सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला. सध्या आनंद व्यक्त करायला मला शब्द अपूरे पडत आहेत.”.

  संजय जाधव ह्यांच्या टीमने आणि त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक सरप्राइज बर्थ डे पार्टी 17 जुलैला रात्री ठेवली होती. ह्या बर्थडे पार्टीत संजय जाधव ह्यांचे स्वागतही आगळ्या पध्दतीने करण्यात आले.


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Sanjay Jadhav, New Website, Hindi Movie, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.