Cine Marathi

Home News Bio About Contact

लोकप्रियतेमध्ये सलमानला संजय दत्तने मागे टाकले, स्कोर ट्रेंड्सवर बनला सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी....

  स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवर संजय दत्त सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. संजय दत्तच्या जीवनावर बनलेल्या संजू चित्रपटामूळे त्याच्या लोकप्रियतेत ही लक्षणीय वाढ झालेली आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असेल की, एखादा अभिनेता एखाद्या चित्रपटाचा भाग नसतानाही त्या चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचावा.

  संजय दत्तची आत्मकथा संजू सिनेमाव्दारे सिल्व्हर स्क्रिनवर झळकल्यावर चित्रपटाने अभूतपूर्व बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. आणि मग जादूची कांडी फिरवल्यासारखी संजय दत्तचीही लोकप्रियता वाढली. 61 गुणांसह सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनलेल्या संजय दत्तने प्रसिध्दीत आपला मित्र सलमान खानला मागे टाकले आहे. संजय दत्त प्रमाणेच संजू चित्रपटाचा अभिनेता रणबीर कपूरला ही सिनेमाच्या प्रसिध्दीचा फायदा झाला. रणबीर कपूर 44 गुणांसह तिसर-या स्थानी पोहोचला आहे. रणबीरने लोकप्रियतेमध्ये अक्षय कुमार आणि बिग बींनाही मागे टाकले आहे.

  स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “संजू चित्रपटाच्या प्रमोशनमूळे संजय दत्तविषयी गेल्या काही दिवसांमध्ये न्यूज प्रिंट, आणि डिजीटल विश्वात भरपूर लिहीलं गेले आहे. सोशल मीडियावर सुध्दा संजय दत्तविषयी भरपूर चर्चा झाली. संजू चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे संजयची लोकप्रियताही एवढी वाढली की गेल्या काही आठवड्यांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सलमान खानला मागे टाकत, संजय दत्त सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला.”

  अश्वनी कौल पूढे म्हणतात, " 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Sanjay Datt, Hindi Movie, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.