Cine Marathi

Home News Bio About Contact

झी युवा 'संगीत सम्राट पर्व २' ऑडिशन १९ मे ला आपल्या कोल्हापूर शहरात......

  संगीत अर्थात सूर...लय आणि ताल यांचा सुरेख संगम. जेव्हा श्रवणीय स्वरांना मधूर आवाजाचा स्पर्श होतो आणि तालाची जोड मिळते तेव्हा ऐकणाऱ्याचे पाय आपसूकच ठेका धरतात. मान नकळत डोलायला लागते. पापण्या मिटून ते स्वर कानात साठवण्याचा ध्यास लागतो. संगीताची ही किमया आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संगीत व्यापून राहिले आहे. किंबहुना माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक भावना तो संगीताच्या सोबतीने अनुभवतो...जगतो. एखाद्या गाण्याचे स्वर, शब्द, त्यातील अर्थ जीवनाच्या कित्येक वळणावर अनुभूतींची शिदोरी देतो. स्वरांवर प्रभुत्व मिळवणारा पट्टीचा गायक स्वर आराधना करण्यासाठी आयुष्य वेचत असतो. चाली रचणाऱ्यांच्या मनात क्षणोक्षणी स्वरांचे तरंग उमटत असतात. कठोर रियाजाने वादकांच्या हातात तालाची जादू येत असते. टीपेला पोहोचणारा आवाज, मनात रूंजी घालणारे संगीत आणि कधी थांबूच नये असा ताल ऐकला की आपोआप ओठावर शब्द येतात...'संगीत सम्राट' झी युवावर या गाजलेल्या कार्यक्रमाचे दुसरे पर्व सुरु होत आहे . संगीत सम्राट पर्व २ च्या ऑडिशन नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद या शहरात झाली आणि आता शेवटची दोन ऑडिशन कोल्हापूर आणि मुंबई या शहरात होणार आहेत. १९ मे ला संगीत सम्राट पर्व २ चे ऑडिशन कोल्हापुर शहरात सकाळी ८ वाजता विबग्योर हायस्कुल , आर एस ३०१ ए , मुडशिंगी रोड , उचगाव , कोल्हापूर , महाराष्ट्र ४१६००५ येथे होणार आहेत.

  महाराष्ट्रातील अनेक होतकरू गायक आणि संगीतकार त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीच सोने करण्याची वाट पाहत असतात. मात्र अशा संधी फार कमी येतात. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील संगीत आणि गायकी क्षेत्रातील कलाकारांना एक वेगळा दर्जा मिळाला. गाण्यांवर आधारित रिअॅलिटी शोच्या या गर्दीत 'संगीत सम्राट' या आगळ्या वेगळ्या म्युजिक रिऍलिटी कार्यक्रमाने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. नव्या स्वरूपातील ‘संगीत सम्राट पर्व २' एका वेगळ्या स्तरावर सुरु होणार आहे . या पर्वामध्ये संगीतमय माणसाचा शोध आणि माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे पण एका नव्या आणि वेगळ्या पद्धतीने. या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे नाही तर संगीत सम्राट हा कार्यक्रम अशा कलाकारांसाठी आहे जे कोणत्याही वाद्यापासून वस्तूपासून सुमधुर संगीत बनवू शकतील. तमाम मराठी प्रेक्षकांना स्वतःत असलेले संगीतगुण जगासमोर आणण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.

  'संगीत सम्राट पर्व २'मध्ये सहभागी होण्यासाठी ऑडिशन्सला लवकरच सुरुवात होणार असून कोणत्याही वयोगटातले स्पर्धक यात सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धेला जसे वयाचे बंधन नाही तसेच विशिष्ट संगीतप्रकाराचे बंधन नसेल. यात तुम्ही एकटे, जोडीदारासोबत किंवा पूर्ण ग्रुपसोबतही सहभागी होऊ शकता. गायन, वाद्य वाजवणे तसेच बँड परफॉर्मन्स सादर करणे हे या शोचे वैशिष्ट्य असेल. यात सहभागी होण्यासाठी कोणतेही बंधन नसल्याने उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.

  तर मग तयार रहा महाराष्ट्राच्या लाडक्या भव्य म्युजिक रिऍलिटी शोसाठी संगीत सम्राट पर्व २ ऑडिशन पत्ता: वेळ सकाळी ७ वाजल्यापासून प्रवेशिका ऑडिशनच्या पत्त्यावर ऑडिशन च्या दिवशीच मिळतील.


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Sangeet Samrat Part 2, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.