Cine Marathi

Home News Celebs About Contact

अन्नु कपूर आणि अक्षय कुमारच्या" उपस्थितीत रंगणार सारेगमप "घे पंगा कर दंगा" लाईव्ह महाअंतिम सोहळा.

  'सारेगमप' ची जुनी परंपरा मोडत ह्या पर्वाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभरातून ३६ पंगेखोर निवडले गेले, त्यापैकी १२ पंगेखोर घे पंगा कर दंगा म्हणत, महाअंतिम सोहळ्यात पोहोचले आहेत.

  मराठी टेलिव्हिजन विश्वात प्रथमच हा महाअंतिम सोहळा वेगळ्या पद्धतीने आकार घेत आहे. ह्या रविवारी म्हणजेच ७ जानेवारी ला दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत हा सोहळा “लाईव्ह” रंगणार आहे. ह्यातूनच आपल्याला ह्या पर्वाचा "पंगेखोर" महाविजेता मिळणार आहे, महाविजेत्याला मिळेल ५ लाखाचे बक्षिस, त्यासोबत झी मराठीच्या मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी. तसेच “द्वितीय क्रमांका” ला मिळतील ३ लाख रुपये, आणि “तृतीय क्रमांका” ला मिळतील २ लाख रुपये, त्यासोबत झी मराठीच्या मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी.

  या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे घरबसल्या प्रेक्षकांनाही जिंकता येणार १ लाखाचं बक्षिस. प्रेक्षक घर बसल्या महाविजेत्या बद्दल अंदाज बांधू शकतात. जे प्रेक्षक अचूक अंदाज बांधू शकतील, त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला मिळणार एक लाखाचं बक्षिस. ज्यासाठी प्रेक्षकांना मदत होईल पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, मनवा नाईक, निलेश मोहरीर आणि हृषिकेश जोशी यांसारख्या कानसेन कलाकारांची. जसं आपण न्यूज चॅनेलवर एक्झिट पोल बघतो त्याचप्रमाणे इथे देखिल या कलाकारांचं स्पेशल पॅनल असणार, जे आपल्याला अधूनमधून भेटत महाअंतिम सोहळ्याच्या निकालावर प्रकाश टाकणार आहेत. या आगळ्यावेगळ्या पॅनलचं सूत्रसंचालन करणार आहे प्रियदर्शन जाधव.

  ह्या सोहळ्यात "रवी जाधव, बेला शेंडे आणि स्वानंद किरकिरे" ह्या परीक्षकांसोबत "अन्नु कपूर” हे विशेष परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. "अक्षय कुमार" हे देखील सारेगमप महाअंतिम सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 तर मग तयार आहेत ना ह्या महाअंतिम सोहळ्याचे लाईव्ह साक्षीदार व्हायला, पाहायला विसरूनका "सारेगमप घे पंगा कर दंगा" चा महाअंतिम सोहळा रविवार ७ जानेवारी २०१८, दुपारी १२ वा. पासून लाईव्ह आपल्या झी मराठी आणि झी मराठी HD वर.

Tags and Keywords: Akshay Kumar, Annu Malik, Sa Re Ga Ma, Ghe Panga Kar Danga, Zee Marathi Serials, MArathi Serials, Celebs, Singing.


You May Also Like