Cine Marathi

Home News Bio About Contact

प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या कारला लोणावळ्यात भीषण अपघात...

 अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना नुकतीच समोर येत आहे. प्रार्थना आणि अनिकेत गाडीतून मस्का सिनेमाच्या प्रमोशनसाठी चालली असताना हा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ यांच्या कारला अपघात झाला.

 अपघात झाला त्यावेळी कारमध्ये अनिकेत, प्रार्थना, प्रार्थनाची असिस्टंट आणि चालक असे चौघेजण उपस्थित होते. ‘आम्ही दोघंही सुखरुप आहोत. असं असलं तरीही प्रार्थनाच्या हाताला उजव्या हाताला दुखापत झाली आहे.

  प्रार्थनाची सहाय्यक स्वाती यांच्या फॉरचुनर गाडीला लोणावळ्याजवळ हा अपघात झालाय. मुंबईहून कोल्हापूर ला मस्का च्या प्रमोशन साठी हे निघाले होते. अनिकेत पुढे बसला होता, तो झोपला होता त्यामुळे त्याला नक्की काय झालं ते कळलं नाही. पोलिस आणि स्थानिकांनी तात्काळ तिथे धाव घेतली आहे.


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Maska Movie, Aniket Vishwasrao, Prarthana Behre, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.