Cine Marathi

Home News Bio About Contact

अक्षय कुमारने केली पिपिंगमून मराठी वेबसाईट लॉन्च

  बॉलीवूड घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स असलेली, आणि बॉलीवूडमध्ये लोकप्रिय असलेली पिपिंगमून वेबसाइट आता मराठीमध्ये आपलं पाऊल ठेवत आहे. बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने नुकतीच क्लॅपींग हॅण्ड्स प्रायव्हेट लिमिटेडची पिपिंगमून मराठी ही वेबसाईट लॉन्च केली.

  बॉलवूडचे जाणकार पत्रकार मार्क मॅन्यूअल आणि निशांत अ. भुसे ह्यांची पिपिंगमून ही वेबसाइट सप्टेंबर 2017मध्ये लाँच झाली. लाँच होताच ह्या वेबसाइटने बॉलीवूडच्या लेटेस्ट घडामोडी वेबसाइटवर सातत्याने अपडेट केल्याने हिंदी सिनेमाच्या चाहत्यांच्या मनात अल्पावधीतच पिपिंगमूनने अढळ स्थान मिळवले. आता ही वेबसाइट मराठीत पाऊल ठेवत आहे.

 ह्याविषयी पिपिंगमूनचे संचालक मार्क मॅन्यूअल आणि निशांत अ. भुसे म्हणाले, “ब़ॉलीवूडची बातम्यांसाठीची वेबसाइट चालू करताना मराठीफिल्म इंडस्ट्रीच्या घडामोडींसाठीचीही वेबसाइट चालू करण्याचा विचार होता. आता आमच्या बॉलीवूड वेबसाइटला एक वर्ष पूर्ण होत असताना मराठीत आम्ही पाऊल ठेवत असल्याचा आम्हांला आनंद आहे. आणि बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार ह्यांच्या हस्ते वेबसाइट लाँच होणे आमच्यासाठी अभिमानाचे आहे.”

  बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार म्हणाले, “बॉलीवूड बातम्यांसाठी मी पिपिंगमून वाचतो. पण माझ्यासारख्या मराठी फिल्म चाहत्यांना मराठी फिल्म-टेलिव्हीजन-नाट्य घडामोडीही आता पिपिंगमूनवर वाचता येतील, ही नक्कीच आनंदाची बाब आहे. पिपिंगमूनच्या वाटचालीला माझ्या शुभेच्छा.”


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Marathi Movie, Piping Women Website, Akshay Kumar, Music Launch, Hindi Movie, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.


-