Cine Marathi

Home News Celebs About Contact

पत्रलेखन हि खाजगी गोष्ट 'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून सर्वांची झाली

  मुंबई: २५ डिसेंबर २०१७ वाचकदीनी अरविंद जगताप लिखित 'पत्रास कारण की...' पुस्तकाचा प्रकाशन समारंभास डॉ. निलेश साबळे, सयाजी शिंदे, संजय जाधव, हेमलता अंतरकर, रमेश भाटकर, गणपतराव जगताप, सुदेश हिंगलासपूरकर, किरण येले इ. मान्यवर मंडळी उपस्थित होती.

  अरविंद जगताप यांची पत्रलेखन हि खाजगी गोष्ट 'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून सर्वांची झाली आणि आता 'ग्रंथाली' मुळे पुस्तकरूपाने अली याबद्दल आनंद व्यक्त केला.

  यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी काहींनी अरविंद जगताप यांच्याबद्दलच्या काही आठवणी ताज्या केल्या. ‘हिंदीमध्ये शेतकऱ्यांबद्दलचं पत्र काव्यात्मक भाषेत अरविंद जगताप यांनी लिहिले होते. अनुपम खेर याना ते प्रचंड आवडले होते. ते पत्र वाचून माझ्याही डोळ्यांत अश्रू आले होते,' असे ही त्यांनी सांगितले, अशी आठवण निलेश साबळे यांनी सांगितली. 'पत्र ही आधीच्या काळी खूप जिवाभावाची गोष्ट असायची आणि अरविंदने आता पात्रांची जबाबदारी घेतली आहे. आजपर्यंतच्या निरनिराळ्या सिनेमांमधील त्याचे लिखाण खूपच अप्रतिम आहे, याचा मला अनुभवही आहे,' अशी भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. 'एक लेखक, कवी म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख आहेच. पण एक माणूस म्हणून कसं असावं हे मी त्यांच्याकडून शिकत आलो आहे,' अशी आठवण दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितली.

  पुस्तकाची मूळ किंमत १५० रुपये असून वाचकांना सवलतीत १०० रुपयात उपलब्ध आहे; असे 'ग्रंथाली'च्या वतीने सुदेश हिंगलासपूरकर यांनी जाहीर केले.

Tags and Keywords:Chala Hava Yeu Dya, Patras Karan Ki, Dr. Nilesh Sabale, Bhau Kadam, Kushal Badrike, Bharat Ganeshpure, Marathi Commedy Serial, zee Marathi Serials, Prime Time Serials, Marathi Acters, Celebrity Child

You May Also Like