Cine Marathi

Home News Celebs About Contact

संग्राम साळवी ने घेतली स्वतःची नवीकोरी गाडी, आईच्या हाताने केली पूजा....

  स्टार प्रवाहच्या ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतील राजस या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या संग्राम साळवीवर कुलस्वामिनीची कृपा झाली आहे. स्वत:ची कार घेण्याची संग्रामची इच्छा नुकतीच पूर्ण झाली.

  संग्रामनं या पूर्वी स्टार प्रवाहच्या ‘देवयानी’ या मालिकेत काम केलं होतं. संग्रामचा लुक आणि संग्रामचा संवाद 'तुमच्यासाठी काय पण!" महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरला. या मालिकेनंच संग्रामला ओळख मिळवून दिली. ‘देवयानी’ मालिकेनंतर स्टार प्रवाहनं संग्रामला पुन्हा एकदा ‘कुलस्वामिनी’ या मालिकेच्या रुपानं मोठी संधी दिली. वेगळं कथानक असलेल्या या मालिकेलाही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे.

  कार घेण्याच्या स्वप्नाविषयी संग्राम म्हणाला, 'बऱ्याच काळापासून स्वत:ची कार हवी हा मनात विचार होता. मात्र, काही ना काही कारणानं ते शक्य होत नव्हतं. स्टार प्रवाहनं केवळ मला अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली असं नाही, तर आर्थिक स्थैर्यही दिलं. त्यामुळेच हे शक्य झालं. ‘कुलस्वामिनी’ ही मालिका सुरू झाल्यानंतर कार घेण्याचा विचार मी प्रत्यक्षात आणू शकलो. स्टार प्रवाहनं कायमच माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला.'

Keword or Tags : Kulswamini Marathi serial, Marathi actors car, Sangram Salvi, Khushboo Tawade, Rashmi Anpat, Star Pravah, Star Pravah serial, Sangram Salvi Engagement, Sangram Salvi new car

You May Also Like