Cine Marathi

Home News Bio About Contact

झी टॉकीज आयोजित 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मध्ये दिसणार मातब्बर कुस्तीवीरांची फ़ौज!!

  हा भारतीय खेळ असल्या कारणाने आपल्याकडे खेडोपाडी हा खेळ खेळला जातो. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चांगले आणि उमदे खेळाडू आहेत पण त्यांना स्वतःला सिद्ध करायला मोठी व्यासपीठचं नाहीत. कुस्ती हा खेळ, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. हा जसा ताकदीचा खेळ आहे तसाच बुध्दीचा सुद्धा आहे. त्यामुळे या खेळात खेळणारे कुस्तीगीर हे जर या दोन्ही गोष्टींमध्ये सरस असतील तरचं त्यांचा टिकाव लागू शकतो.

  'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' या नव्या स्पर्धेच्या रूपानं झी टॉकीज कुस्ती अनेक चांगल्या आणि त्याबरोबरच अनेक प्रसिद्ध खेळाडूंना सोबत घेऊन नव्या दंगलीसाठी सज्ज होत आहे. यात अनेक नामवंत खेळाडू सहभागी होत असून त्यात राहुल आवरे, किरण भगत, प्रसाद सस्ते, ज्योतिबा अटकळे, अक्षय शिंदे, वसंत सरवदे, सोनबा गोंगणे, शिवराज राक्षे, गणेश जगताप, उत्कर्ष काळे, रणजीत नलावडे ह्या दिग्गज खेळाडूंचा खेळ आपल्याला केवळ 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मधेच अनुभवयला मिळेल.

Kushti Leauge
Kushti Leauge
Kushti Leauge
Kushti Leauge
×

  'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मध्ये राजस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना घर बसल्या मिळणार आहे. पुण्याचा राहुल बाबासाहेब आवारे हा देखील या 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मध्ये सहभागी होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीमधून राहुल आवारे यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अलिकडेच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत राहुुल यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. त्याआधी राहुल यांनी २०११ मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. असा हा गुणी, मेहनती कुस्तीपटू महाराष्ट्र कुस्ती लिगमध्ये इतर खेळाडूंसह उतरणार आहे. त्याचप्रमाणे साताऱ्याच्या पैलवान आणि महाराष्ट्र केसरी विजेता किरण भगत याने गेल्या काही वर्षांत गावोगावी कुस्तीची मैदाने जिंकली आहेत. त्यामुळे त्याच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. त्यामुळेच मैदानी कुस्तीचा हिरो म्हणून त्याने महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे. किरणचा खेळ आक्रमक असून समोरच्या प्रतिस्पर्धी कसा आहे, यावर तो त्याची रणणिती ठरवतो. यंदा होणा-या या 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मध्ये यासारखे अनेक उत्तम खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

  झी टॉकीज आयोजित 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' २ नोव्हेंबर पासून १८ नोव्हेंबर पर्यंत बालेवाडी स्टेडियम पुणे इथे रंगणार असून त्याचे थेट प्रक्षेपण झी टॉकीज या वाहिनीवर होणार आहे . 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' द्वारे प्रेक्षकांना आपला भारतीय खेळ किती मोठा आहे आणि महत्वाचे म्हणजे या खेळामध्ये किती थरार आहे हे स्वतःच्या घरात टिव्ही समोर बसून अनुभवायला मिळेल. आता भिडायचंच मार मुसंडी म्हणत झी टॉकीज प्रत्येक भारतीयाला आव्हान करीत आहे की चला एकत्र होऊ या आणि आपल्या भारतीय खेळाला आणि खेळाडूंना नावारूपाला आणूया.

  भारतीय कुस्ती संघाचे सहसचिव श्री. विलास कथुरे यांनी सांगितले की, 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मध्ये राहुल आवरे , किरण भगत , उत्कर्ष काळे सारखे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू खेळत आहेत . या खेळाडूंच्या अनुभवाचा, लीग मधल्या इतर खेळाडूंना नक्कीच फायदा होईल. झी टॉकीज च्या माध्यमाने आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम आणि डावपेच ह्याची योग्य माहिती वेगवेगळ्या खेडेगावांत तालमीमध्ये पोहोचवली जाईल. तसं पाहता, महाराष्ट्रात कुस्तीची पूर्वापार मोठी परंपरा आहे , परंतु महाराष्ट्रातील कुस्तीगिरांना आर्थिक प्रश्न नेहमीच भेडसावत असतो . झी टॉकीज च्या 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मुळे हा आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या खेळाडूंच्या मागे आता झी समूह आणि या लीग मध्ये जोडल्या जाणाऱ्या फ्रॅंचाईस मुळे या खेळाडूंचा फायदा होणार आहे.'

  छत्रपती आणि अर्जुन पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू श्री. काका पवार यांनी सांगितले की, 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मधून तयार झालेले मराठी कुस्तीवीर ऑलम्पिक मध्ये जाऊन देशासाठी पदके आणतील. ग्रामीण भागातील तळागाळातील कुस्तीगीर आता घरात बसून झी टॉकीज या वाहिनीवर 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' पाहू शकतील आणि त्यांचा कुस्ती या खेळाकडे पाहण्याचा उत्साह वाढेल. बीड मधला राहुल आवरे, साताऱ्याचा किरण भगत, बारामती चा उत्कर्ष काळे अशा मोठ्या खेळाडूंच्या सहभागामुळे 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' मध्ये होणारे सामने अव्वल दर्जाचे असतील. ज्याप्रमाणे आधी शाहू महाराजांचं कुस्तीवीरांना पाठबळ होत त्याचप्रमाणे आता झी टॉकीज देखील कुस्तीगिरांच्या मागे ताकदीने उभे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे उत्कृष्ट खेळाडू, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅटवरचे सामने आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम व डावपेच होतकरू खेळाडूंना घरी बसल्या पाहायला मिळतील आणि त्यामुळे अनेक खेळाडू या लीगमुळे नव्याने तयार होतील ही मी आशा बाळगतो.

  झी टॉकीज आणि झी युवाचे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, ‘भारतीय खेळाला पाठिंबा देणे आणि त्याच बरोबर कुस्ती सारख्या खेळातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल बनवणे हेच महाराष्ट्र कुस्ती लीग चे मुख्य उद्दिष्ट आहे. याबरोबरच आपल्या कुस्तीवीरांना त्यांच्या खेळाचा उत्तम आर्थिक मोबदला मिळणे व कुस्तीवीरांच्या खेळाचा दर्जा उंचावणे हे ही तेवढेच महत्वाचे आहे . या सर्व गोष्टीची योग्य दखल झी टॉकीज घेत आहे. 'झी महाराष्ट्र कुस्ती लीग' द्वारे राज्यस्तरीय , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा उत्तम खेळ प्रेक्षकांना पहायला मिळेल.Tags:- #Sai Tamhankar, #Lucky, #Rhudyat Something Something, #Dangal, #LOve Sonia, #Zee Marathi, #Marathi Serials,#Adarsh Shinde, #Marathi Movie, #Baapmanus, #Sangeet Samrat, #Ashok Saraf, #Aniket Vishwasrao,#Dostigiri, #Sneha Chavan, #Akshay Kumar, #Sanjay Narvekar, #Umesh Kamat, #Tejeswini Pandit, #Music Launch, #Hindi Movie, #Movie Songs, #Teaser, #Superhit Marathi Movie, #Marathi Masala, #Marathi Acters, #Acters.