Cine Marathi

Home News Bio About Contact

झी युवाच्या कट्टी बट्टीने सेटवर १०० वा एपिसोड साजरा केला

  युथफूल कन्टेन्टने सर्व रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. झी युवावरील प्रत्येक मालिका आणि त्यातील पात्रं ही महाराष्ट्राच्या घराघरातपोहोचली आणि त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भागच बनली आहेत. झी युवाने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली.लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या कट्टी बट्टी या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. १४ जून २०१८ रोजी कट्टी बट्टीने पहिला यशस्वी 100 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. हा मैलाचा दगड संपूर्ण टीमने एकत्र येऊनकेक कापून साजरा केला.

  १०० वा एपिसोड पूर्ण केल्या बद्दलची उत्सुकता सांगत अश्विनी कासारने सांगीतले, “प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे. या मालिकेची संपूर्ण टीम म्हणजे आमचं विस्तारित कुटुंबच आहेआणि त्यांच्या सोबतच हा आनंद साजरा केला कारण या मागे प्रत्येकाची मेहनत आणि चिकाटी आहे.” या आनंदाच्या क्षणी बोलताना पुष्कर सरदने सांगीतले, "१०० एपिसोडचा टप्पा गाठल्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला आहे, आणि त्यासाठी मला आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आणि आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या प्रेक्षकांनाधन्यवाद करायचं आहे.”

  तेव्हा कट्टी बट्टी पहायला विसरु नका प्रत्येक सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता फक्त झी युवा


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Katti Batti, 100 Episode, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.