Cine Marathi

Home News Bio About Contact

शशांक केतकरचे पुण्यात आहे 'आईच्या गावात' हॉटेल जाणून घ्या बरंच काही.

  तुम्हाला माहीत आहे का शशांक एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक बिझनेसमनही आहे. अभिनयासोबतच शशांकची हॉटेल इंडस्ट्रीत एन्ट्री झाली आहे. दस-याच्या मुहूर्तावर म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी शशांकने पुण्यात स्वतःचे एक हॉटेल सुरु केले आहे. अमृता खानविलकर हिच्या हस्ते हॉटेलचे ओपनिंग 2016 साली झाले होते.

  'आईच्या गावात' असे अतिशय हटके नाव शशांकच्या हॉटेलचे आहे. तरुणाईला आकर्षित करणारे नाव मला हवे होते. येथे बसलेली तरुण मंडळी जेव्हा त्यांच्या मित्रांना आईच्या गावात बसलोय, असे सांगतात, तेव्हा आपल्या आईच्या गावाला गेल्याची भावना मनात येते, असे शशांक सांगतो.

  शशांकने या हॉटेलचे इंटेरिअर अगदी हटके पद्धतीने केले आहे. एका भींतीवर त्याने कार्टुन्सच्या रुपात देखावे सादर केले आहेत. स्नॅक्ससोबतच जेवणाची व्यवस्था त्याच्या या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. सकाळी साडे तीनशे आणि संध्याकाळी दीडशे चपात्या या हॉटेलमध्ये तयार होतात. शुद्धा शाकाहारी पदार्थ शशांकच्या हॉटेलमध्ये मिळतात. विशेष म्हणजे शशांक स्वतः एक उत्कृष्ट कुक आहे.


Tags:- Zee Marathi, Marathi Serials,Hotel 'Aaichya Gavat', Shashank Ketkar, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.