Cine Marathi

Home News Bio About Contact

‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन...

 आइझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. ह्या शास्त्रज्ञांना आपल्या नव्या पोस्टर व्दारे 'इपितर' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्रिब्यूट दिलेला आहे.

  पोस्टरविषयी सांगताना दिग्दर्शक दत्ता तारडे म्हणतात, "आपण वेडेपिर असल्याशिवाय नवे शोध लागत नाहीत, हे ह्या शास्त्रज्ञांनी सिध्द केलं आहे. तसेच इपितर सिनेमातले हे तीन नायक आहेत. ह्या तीन नायकांचं 'वेड' आणि त्यांचा इरसालपणाचं संपूर्ण सिनेमा घडवतो."

  लेखक-निर्माते किरण बेरड सांगतात, "आमच्या सिनेमाची टँगलाइनच आहे, 'लईच येडे भो'... ह्या थोर शास्त्रज्ञांसारखेच ह्या तीन नायकांमध्ये असलेली ध्येयाने झपाटण्याची वृत्ती एकिकडे तुम्हांला सामाजिक संदेश देईल. तर त्यांच्या ह्या वृत्तीमूळे जी विनोदनिर्मिती सिनेमात होते. त्यामूळे तुमचे मनोरंजन होईल."

  डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे. दत्ता तारडे दिग्दर्शित ह्या विनोदी सिनेमात भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे ,जयेश चव्हाण ,विजय गीते ,गणेश खाडे ,निकिता सुखदेव, वृंदा बाळ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. इपितर चित्रपट 8 जून 2018 ला रिलीज होणार आहे.


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Epitar Movie, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.