Cine Marathi

Home News Bio About Contact

सतत बातम्यांमध्ये राहिलेली डेजी शाह, स्कोर ट्रेंड्स इंडियावर बनली नंबर वन !

  गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या रेस-3 चित्रपटामूळे बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाह चर्चेत राहिली. रेस-3 मधला ‘अवर बिजनेस इज अवर बिजनेस... नन ऑफ युवर बिजनेस’ हा संवाद खूप लोकप्रिय झाला. सलमानच्या डायलॉग्सपेक्षा डेजीच्या तोंडी असलेल्या ह्या संवादाला चाहत्यांची पसंती मिळाली.

  न्यूजमध्ये सतत राहिल्यामूळे डेझी ‘न्यूज प्रिंट’मध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेड्सच्या चार्टवर 72 गुणांसह डेझी शाह ‘न्यूज प्रिंट’मधली नंबर वन अभिनेत्री आहे. तर तिची रेस-3मधली कोस्टार आणि दबंग टूरमधली सहकारी जॅकलीन फर्नांडिस 57 गुणांसह दूस-या स्थानी आहे.

  स्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “देशभरातल्या मीडियाने गेल्या एका महिन्यात डेजीच्याविषयी छापलेल्या न्यूज कव्हरेजमूळे ‘न्यूज प्रींट’ मीडियामधली ती सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे सोशल मीडियामध्येही डेझीची वेगाने प्रसिध्दी होताना दिसतेय. स्कोर ट्रेंड्स लीडरबोर्डमध्येही डेजी 16 व्या स्थानावरून 5 व्या स्थानी पोहोचली आहे."

  अश्वनी कौल पूढे म्हणतात, " 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Daisy Shah, Race 3, Hindi Movie, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.