Cine Marathi

Home News Celebs About Contact

पहा अमृता आणि वैभवचा रॅम्पवर शाही अंदाज

  आपल्या अभिनयाने आणि दिलकश अदेने प्रेक्षकांना दिवाण बनवणारी अभेनेत्री अमृता खानविलकर सध्या फारच चर्चेत आहे. अमृताचं हिंदी शो मध्ये असलेलं सूत्रसंचालक तिच्या मराठमोळ्या प्रेक्षकांना फारच आवडत आहे.

  ह्याच मराठ मोळी अभेनेत्रीने नुकतेच एक रॅम्पवाक केले. पुणे टाईम्स फॅशन वीक मध्ये शाही लहंगा-चोली घातलेली अमृता यावेळी फारच खुलून दिसत होती. तिने हे पहिलंच रॅम्पवॉक केलं. विशेष म्हणजे अभेनेता वैभव तत्ववादीनेही अमृता सोबत रॅम्प वॉक केला. या जोडीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ह्या कार्यक्रमाचे फोटो अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केले. नववधूचा पेहराव घालून रॅम्पवर उतरलेल्या अमृताचं रॅम्पवॉक सगळ्यांसाठीच लक्षवेधी ठरलं. रामनवमीवर प्रेरित असलेला हा पेहराव खूपच सुंदर आणि वाखाण्याजोग होता. तिच्या या अदानी तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे.

  मला जेव्हा यासाठी विचारणा केली होती तेव्हा मला फारच आनंद झाला होता, तसेच हा माझा पहिला रॅम्पवॉक असल्यामुळे तो माझ्या कायम लक्षात राहील, असं अमृता सांगते. रॅम्पवॉक नंतर अमृता अतिशय भावुक झाली होती.

  फॅशन डिझायनर श्रुती आणि मंगेशने डिझाईन केलेला अतिशय भरजरी पिवळ्या रंगाचा घागरा, दपका आणि झर्दोसी ने सजवलेली चोळी आणि दुपट्टा यावेळी अमृताने परिधान केला होता. तर तिच्या ह्या पेहरवामुळे तिचं सौंदर्य अधिक खुललं होतं.


You May Also Like