Cine Marathi

Home News Bio About Contact

झी युवावरील 'आम्ही दोघी' मालिकेत शिवानी रांगोळेची प्रमुख भूमिका

  'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. प्रेक्षकांनी आधी कधीच न पाहिलेली आणि अनुमभावलेली एक आगळी वेगळी कथा झी युवावाहिनी 'आम्ही दोघी' या नवीन मालिकेतून सादर करत आहे.

  'आम्ही दोघी' मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या अगदी विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस,प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे.

  मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये नावलौकिक असलेली शिवानी रांगोळे मधुरा नावाच्या खोडकर लहान बहिणीची भूमिका करणार आहे. घरामध्ये लहान असलेल्या मुलीवर कुटंबातील सदस्य प्रेमाचा वर्षाव करतातआणि असंच लाडावलेलं शेंडेफळ म्हणजे शिवानी साकारत असलेलं पात्र मधुरा. मोठ्या बहिणीने नेहमीच पाठीशी घातलेले असल्यामुळे मधुराला अडचणीतून फक्त तिची बहिणच तिला सोडवू शकते. एकमेकींवर अतिशय प्रेमकरणाऱ्या या दोघी वेगळ्या स्वभावाच्या असून सुध्दा त्यांच्यात असणाऱ्या अतूट बंधावर या मालिकेमध्ये भर देण्यात आलेला आहे. मालिकेत प्रेक्षकांना नक्कीच ट्विस्ट्स अँड टर्न्स पाहायला मिळणार आहेत.

  तिच्या पात्रा विषयी बोलताना शिवानी रांगोळेने सांगीतले, " थोड्या कालावधी नंतर टेलिव्हिजनवर परत आल्यामुळे मी खूश आहे. मी साकारत असलेले मधुराचे पात्र हे साधारण माझ्यासारखेच आहे त्यामुळे मला ते साकारणे सोपेवाटले. मी आता हि मालिका प्रसारित होण्याची मी आतुरतेने वाट पहात आहे कारण ही कथा अतिशय लक्षवेधक आहे आणि प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल."


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Amhi Doghi, Shivani Rangole, Khushbu Tavade, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.