Cine Marathi

Home News Bio About Contact

आम्ही दोघी मालिकेत आदित्य शोधणार अक्षय लपवत असलेलं सत्य...

  'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. 'आम्ही दोघी' ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन अली आहे. आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. मालिकेत विवेक सांगळे आदित्यची भूमिका साकारत आहेत. मालिकेत सध्या प्रेक्षकांनी पाहिलं की मीराने अक्षयशी लग्नासाठी होकार दिला असून त्यांच्या साखरपुडा लवकरच होणार आहे. पण आदित्यला मात्र हे अक्षय मीरासाठी योग्य वाटत नाही आहे तसेच तो काहीतरी लपवत अशी शंका आदित्यला आहे.

  मीरा आणि अक्षय विवाहबंधनात अडकण्याआधी एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. मीरा अक्षय आणि त्याच्या मित्रांसोबत रात्री जेवायला बाहेर जाते आणि तेथे त्यांच्या सोबत तिला अस्वस्थ वाटतं. जेवणाच्या टेबलवर वेटर मीराला व्हिस्कीचा ग्लास देतो आणि अक्षय तिला तो प्यायला सांगतो. मीरा दारू प्यायला नकार देते आणि त्यामुळे अक्षय संतापतो आणि त्याच्या मित्रांसमोर तिच्या वर ओरडू लागतो. साखरपुड्यासाठी अंगठी घेण्यासाठी मीरा आणि अक्षय सोनाराच्या दुकानात गेले असताना अक्षय त्यांनी ठरल्यापेक्षा पेक्षा जास्त दागिन्यांची मागणी करतो. येथेच आदित्यच्या मनात अक्षय मीरासाठी योग्य नाही असे विचार येऊ लागतात. त्याच्या हास्यास्पद आणि लोभी वर्तनामुळे सर्व कुटुंबाला या लग्नात काहीतरी चुकते आहे असे वाटू लागते.

  अक्षयशी विवाह करण्यापासून आदित्य मीराला वाचवू शकेल का? मीरा हे लग्न मोडेल का? हे शोधण्यासाठी, पहात रहा आम्ही दोघी, रात्री ८ वाजता सोमवार ते शनिवार फक्त झी युवा वर!


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Amhi Doghi, Shivani Rangole, Vivek Sangle Hindi Movie, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.