Cine Marathi

Home News Bio About Contact

अभिनेता विवेक सांगळे 'आम्ही दोघी'मध्ये साकारणार हॅपी गो लकी 'आदित्य'

  'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. 'आम्ही दोघी' ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन अली आहे. आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. मालिकेत विवेक सांगळे प्रमुख भूमिका साकारत आहेत. या दोन बहिणींचे जीवन बदलून टाकणाऱ्या आदित्य गायकवाडची भूमिका विवेक साकारणार आहे. 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेनंतर नवीन व्यक्तिरेखा साकारताना पूर्वी साकारलेल्या 'राघव' इतकंच प्रेक्षकांनी 'आदित्य'ला देखील भरभरून प्रेम द्यावं यासाठी विवेक खूप मेहनत करत आहे.

  दोन बहिणी आणि त्यांच्या नात्याभोवती फिरणारे कथानक असलेल्या 'आम्ही दोघी' या मालिकेतील विवेकची भूमिका देखील तितकीच सक्षम असणार आहे. महत्वाकांक्षी असलेला आदित्य हा बोलघेवडा आणि हॅपी गो लकी व्यक्तिमत्वाचा आहे. तो फ्रेंडली जरी असला तरी तो जशास तसे वागणारा मुलगा आहे. तो रोमँटिक मुलगा असून त्याला स्वतःच्या भावना व्यक्त करता नाही येत. मराठी टेलिव्हिजनवर चॉकलेट बॉय म्हणून प्रसिध्द असलेला विवेक साकारत असलेला आदित्यचं पात्र नखरेबाज आहे आणि तो त्याच्या खऱ्या भावना कधीही व्यक्त करत नाही. पेइंग गेस्ट म्हणून त्यांच्या घरात राहायला आलेला हा आदित्य या दोन्ही बहिणींच्या जीवनात काय बदल करेल हे पाहणे मनोरंजक असेल.

  आदित्य या दोघींच्या आयुष्याला काय वळण देणार हे शोधण्यासाठी पाहायला विसरू नका ‘आम्ही दोघी’ सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता फक्त झी युवा वर


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Amhi Doghi, Shivani Rangole, Vivek Sangle Hindi Movie, Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.